31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीटंचाई आढाव्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी विहिरींवर!

टंचाई आढाव्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी विहिरींवर!

एकमत ऑनलाईन

कळमनुरी (संजय शितळे) : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावात वेळीच उपाय योजना व्हाव्यात आणि ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये याकरीता कळमनुरीचे तहसीलदार मयूर खेंगले व गटविकास अधिकारी आंधळे यांनी शनिवारी (दि.१८) प्रत्यक्ष ग्रामीण भागात जावून सार्वजनिक विहिरी, बोअर तसेच यापुर्वी राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची आढावा घेतला.

कळमनुरी तालुक्यातील वाड्या-तांड्यावर सध्या पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तर काही गावांमध्येही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल होवू लागले आहेत. परंतु, ज्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. तेथे खरचं पाणीटंचाई निर्माण झाली आहे का, त्या गावात यापुर्वी पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोणत्या उपाय योजना राबविण्यात आल्या याचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार मयूर खेंगले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आंधळे यांनी शनिवारी म्हैसगव्हाण, निमटोक, असोला या गावांना दिल्या. या भेटीदरम्यान अधिका-यांनी सार्वजनिक विहिरी, बोअरवर जावून पाहणी केली. त्याच बरोबर ज्या गावात टंचाई दूर करण्यासाठी यापुर्वी राबविण्यात आलेल्या योजनांची माहितीही घेतली.

ग्रामीण भागात दरवर्षी टंचाई दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तसेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. यापुर्वी अनेक गावात लाखों रूपयांचा निधी पाणी टंचाई दूर करण्यासाठी खर्च झाला. प्रत्यक्षात मात्र त्या गावांतील पाणीटंचाई कितपत दूर झाली, त्या योजना किती काळ कार्यान्वित राहिल्या, सध्या सुरू आहेत याचाही आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी नाईक, पाणीपुरवठा विभागाचे सी.जी.सावंत, शेख जमील, तलाठी प्रेम चव्हाण, स्वाती तोटावार उपस्थित होते.

दोन विहिरी, दोन बोअरचे अधिग्रहण
तहसीलदार मयूर खेंगले, गटविकास अधिकारी आंधळे यांनी भेटी दिलेल्या गावात टंचाईचा आढावा घेवून तेथील पाणीटंचाई दूर करण्याकरीता दोन विहिरी, व दोन बोअर अधिग्रहण करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे या गावातील टंचाई काही प्रमाणात दूर होणार असून, ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. दरम्यान, अधिका-यांनी पोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून कोरोना विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर लसीकरणाचा आढावा घेतला.

लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या