29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीदहावी, बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात!

दहावी, बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : मागील महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आकाडाही मोठा आहे. अशा परिस्थितीत मात्र शिक्षण विभागाकडून दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिणामी, विद्यार्थी आणि पालकात मोठी भिती व्यक्त होत असून, ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी गुरूवारी (दि.८) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाचा कहर सुरू आहे. आरोग्य विभाग कोरोना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असलातरी वाढत्या रूग्णसंख्येमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मागील वर्षभरात हजारो जणांना जीव गमवावा लागला तर हिंगोली जिल्ह्यात बळीचा आकडा १०६ वर पोहचला आहे. त्यातच शिक्षण विभागाकडून दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले असून, तसे जाहीर केले आहे.

ही परीक्षा ऑफलाईन झालीतर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असून, मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल. त्याकरीता दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण विभागाकडे करण्यात आली. निवेदनावर प्रज्योत अंबरकर, संघर्ष नरवाडे, वेदांत कान्हेड, सौरभ ढोके, विकास, हर्ष मुंदडा, प्रतीक ढाले, मानव चित्तेवार, यश घुगे, चंदू घुगे, बालाजी सुरूशे, प्रतीक गुठ्ठे, अभिषेक कुरवाडे, विवेक भालेराव, यश शर्मा, वृषभ, वैभव पाटील, अमोल थोरात, ऋतीक सिपडे आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

लॉकडाऊन विरोधात व्यापा-यांची निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या