34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeहिंगोलीत्या' दुर्देवी अपहर्र्त मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, शोककळा

त्या’ दुर्देवी अपहर्र्त मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, शोककळा

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापुर (शफी डोंगरगावकर) : कामठा फाटा येथे वास्तव्यास असलेल्या राजस्थान राज्यातून येऊन आखाडाबाळापुर व परिसरातील लोकांचे मनोरंजन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील ९वर्षीय मुलीचे मागील दहा दिवसांपूर्वीपूर्वी अपहरण करण्यात आले होते. त्या दुर्दैवी मुलीचा मृतदेह एका विहिरीत दि.२ मार्च रोजी कामठा फाटा शिवारात सापडल्याने ‘त्या’ मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आखाडाबाळापुर पोलीस स्थानक अंतर्गत असलेल्या येथुन ७ कि.मी.अंतरावर असलेल्या कामठा फाटा शिवारामध्ये मागील १० ते १६ दिवसापूर्वी राजस्थान राज्यातील टोक जिल्ह्यातील बहिर मुल्ला या गावातील काही कुटुंब आखाडाबाळापुर व परिसरातील लोकांचे मनोरंजन करून त्यावर उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले होते. लोकांना विविध खेळ मनोरंजन दाखवून त्यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील रेश्मा गुड्डू शहा या नऊ वर्षीय मुलीचा मागील दहा दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आल्याची तक्रार सदरील कुटुंबीयांनी आखाडाबाळापुर पोलीस स्थानकात दिली होती. या तक्रारीची दखल गंभीरपणे घेत स्वतः पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतीश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, फौजदार अच्युत मुपडे स.पो.निरीक्षक श्रीनिवास रोयलावर,फौजदार प्रतिभा शेटे जमादार संजय मार्के, सुरेश नांगरे यांच्या पथकाने घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.

परंतु हरवलेली मुलगी सापडली नव्हती मागील दहा दिवसापासून सापडले नसल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले होते. शेवटी दिनांक २ मार्च रोजी सकाळी कामठा फाटा शिवारातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या १३२ के. व्ही.केंद्राच्या पाठीमागील शेतातील विहिरी मध्ये सदरील मुलीचा मृतदेह बाजूला असलेल्या शेतातील हरभरा काढणाऱ्या मजूर महिलांना दिसल्याने त्याची तशी माहिती आखाडाबाळापुर पोलीस स्थानकात दिल्यावर रवी हुंडेकर व त्यांच्या पथकाने जाऊन मुलीची शहानिशा केली व कुटुंबियांना सोबत घेऊन मुलगी दाखवली हीच मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या कुटुंबियांनी त्या परिसरात मोठा हंबरडा फोडला यावेळी तेथे उपस्थित असलेले आलेल्या सर्वांची डोळे पाणावले होते. यावेळी परिसरात मोठा जमा झाला होता.

मुलीच्या अपहरण प्रकरणाने परिसरात दहशत पसरली आहे मुलींचे अपहरण करणारे कोण? कशासाठीअपहरण केले? याबाबत पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान दुर्देवी मयत मुलीच्या मृतदेह आखाडाबाळापुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.याबाबत पोलीस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या