Saturday, September 23, 2023

शेतातील नुकसानीची आ. बांगर यांनी केली पाहणी

हिंगोली : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा, फुलदाभा, काकडदाभा, निशाना व येळेगाव सोळंके तसेच कळमनुरी तालुक्यातील वडगाव, रेडगाव,डोंगरगाव पुल, शेवाळा, कान्हेगाव, सालेगाव, सोडेगाव,भुतनर, सावंगी, नांदापूर, रुपुर, कोंढुर, डिग्रस यासह भागातील शेतांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापसासह हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतांची आ.संतोष बांगर यांनी पाहणी केली.

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गंगाधर पोले, माजी सभापती बाबुराव सावळे, शाम महाराज, गंगुबाई साबळे, प्रल्हाद डोरले, सुदाम खोकले, शरद पोले, बाळू पोले, राजू पाटील, उत्तमराव सोळंके, किरण कदम यांच्यासह सरपंच व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Read More  पीकच उगवले नसल्याने शेतक-याची आत्महत्या

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या