28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमहट्ट्यातील तरुणाच्या खुनाचा १२ तासात लागला तपास

हट्ट्यातील तरुणाच्या खुनाचा १२ तासात लागला तपास

एकमत ऑनलाईन

वसमत : तालुक्यातील हट्टा येथील एका तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून खून झाल्याचे स्पष्ट झाले़ काल रात्रीच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

वसमत तालुक्यातील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील मैदानावर प्रभाकर उर्फ प्रभू गंगाराम ठोके (३५) यांचा मृतदेह काल सकाळी आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर खुणा असल्यामुळे हा नेमका खून की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांसमोर उभारला होता. वसमतचे पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक एस.बी. थडवे, जमादार इमरान कादरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सदर तरुणाचा खून असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी तपास चालवला. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले. मात्र श्रान पथक घटनास्थळी घुटमळले. यावेळी चौकशीमध्ये ठोके यांच्यासोबत अन्य दोघेजण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला. त्यामध्ये हट्टा येथील लोभाजी ऊर्फ पिंटू सांगळे व शेख वाजिद शेख चुन्नू हे दोघेजण प्रभाकर ठोके यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात सोमवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर पळून जाणाºया लोभाजी सांगळे यास पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील मानवत येथून ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता दारू पिण्याच्या कारणावरून प्रभाकर ठोके यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी शेख वाजेद यालाही अटक केली आहे.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या