17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home हिंगोली राज्यात मातृभाषेतुन शिक्षणाची गरज-अक्षयसागरजी महाराज

राज्यात मातृभाषेतुन शिक्षणाची गरज-अक्षयसागरजी महाराज

एकमत ऑनलाईन

मकरंद बांगर हिंगोली : देशात कॉनव्हेट संस्कृतीमुळे समाज रसातळाला जात आहे. युवक संस्कृती परंपरेला विसरत आहे अशावेळी मातृभाषेतुन शिक्षण गरजेचे असुन बालकाच्या सर्वागिण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण पोषक असल्याने मध्यप्रदेशात यंदापासुन मातृभाषेतुन सक्तीचे शिक्षण करण्यात आले आहे. याचधर्तीवर राज्यात मातृभाषेतुन शिक्षण द्यावे असे प्रतिपादन जैनमुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी केले.

हिंगोलीत चार्तुमासानिमीत्त जैनमुनिंचा सत्संग लाभला आहे. यात आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्यासंघातील जेष्ठ मुनिश्री १०८ योगसागर महाराज जी ,मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराजजी, मुनिश्री १०८ पूज्यसागरजी महाराज, मुनिश्री १०८ नेमिसागर महाराजजी, मुनिश्री १०८ अतुलसागर महाराजजी, मुनिश्री १०८ निस्सीमसागर महाराज जी, मुनिश्री १०८ शाश्वतसागर महाराजजी, क्षुल्लकश्री १०५ समताभूषन जी महाराज जी जैनमुनी हिंगोलीत येपरमपूज्य निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ योगसागरजी महाराज व परमपूज्य मुनीश्री १०८ अक्षय सागरजी महाराज सहभागी आहेत. यात जैनमुनीचे सकाळी ८. ३० वाजता रत्नकरंडक श्रावकाचार या ग्रंथावर नित्य प्रवचण महाविर भवन सभागृहात होत आहे. यानंतर १२ वाजता जैनमुनींचा सामुहिक पाठ तर ३ वाजता मुनिश्रींचा सामुहिक वर्ग होत आहे.

यावेळी महाराजांशी वार्तालाप केला असता भारत संस्कृती प्रदान देश असुन या पवित्र वसुधरेत जन्म घेणा-या व्यक्तीचे लक्ष नर से नारायण बनण्याचे असावे. यामुळे प्रत्येकाचे लक्ष महान बनण्यासाठी आपला धर्म काय, जिवनाचा अर्थ, परिवार काय आहे हे समजुन घ्यावे. यासाठी ऋषीमुनीनी सांगितलेल्या विचाराचे अनुकरावे लागेल. प्राचीन ऋषीमुनीनी हिंसा प्रसुतानी सर्वदुखानी हिंसा दुखाना जन्म देते. आणी दया धर्माची जननी आहे असे सांगितले.

आज आपण मुलाला अर्थाजन लक्ष घेऊन शिकवत आहोत. मात्र शिक्षणाचे लक्ष चारित्र असावे. मात्र आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करातांना आहार विहारा सोबत कॉनव्हेट शाळेत पाठवत आहोत मुळात कॉनव्हेट शिक्षण पाश्चात्य देशात अनाथ मुलासाठी होते. विदेशी कानव्हेट भारतात लागु करण्याचे लक्ष मॅकव्हलीचे देशात बालक अनाथ पंगु आणी गुलाम व्हावा असे होते. मात्र स्वातंत्र्यानतर मॅकव्हलीचे शिक्षण शिकवीले जात आहे. परिणामी आजचा विद्यार्थी ना घरपरिवार जानतो ना आपली संस्कृती ओळखतो. यामुळे मातृभाषेतुन शिक्षणामुळे भारताचे महासत्तेचे लक्षपुर्ण होईल देशातील विद्वान पंडीत शास्त्रज्ञ मातृभाषेत शिकुनच मोठे झाले असे मत अक्षयसागरजी महाराज यांनी मांडले.

शिक्षणमंत्र्यांनी घेतली जैनमुनींची भेट
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांंनी काल जैनमुनी अक्षयसागरजी महाराज यांची भेट घेतली.यावेळी मुनिश्रीनी मातृभाषेतुन शिक्षणाचे महत्व सांगत नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमात जैन धर्माचे महत्त्व तसेच संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचा उद्देश व त्यांचे कार्य यांचा समावेश करणे गरजेचे आहे असे सांगत विवीध विषयावर चर्चा केली व शिक्षणपध्दतीत बदलाची गरज का आहे यासंदर्भात महत्वपुर्ण वैचारीक माहिती असलेले पुस्तके भेट दिली यावेळी त्यांचा सकल दिगंबर जैन समाज चातुर्मास समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

२४ तासात महाराष्ट्रातील तब्बल ३०३ पोलीस पॉझिटिव्ह!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या