27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home हिंगोली भरदिवसा वृद्ध शेतक-याची लूट

भरदिवसा वृद्ध शेतक-याची लूट

एक लाख रुपये लंपास ; घटना सी.सी.टीव्ही कॅमेरात कैद

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेलेला एक शेतकरी अचानक अंगाला खाज सुटल्याने डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला असता त्याच्या जवळील पिशवीत असलेले एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. घटना दुपारी बाराच्या दरम्यान घडली असून सी.सी.टीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. कळमनुरी शहरातील मोठा मारोती मंदिर परिसरातील रहिवासी रामचंद्र जाधव यांनी आपल्या सोयाबीनची बुधवारी (दि.२) उमरा येथील गोदा फार्मवर विक्री केली. विक्रीनंतर मिळालेले एक लाख रुपये घेऊन ते गुरुवारी (दि.३) शहरातील भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यासाठी आले होते.

पैशांमध्ये ५० रुपयांच्या काही फाटक्या नोटा होत्या. फाटक्या नोटा वेगळया करण्यास बँकेतील रोखपालांनी सांगितले. यानंतर रामचंद्र जाधव बाहेर आले असता अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. जाधव हे बँकेपासून जवळच असलेल्या डॉ.सोमाणी यांच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी गेले होते. तपासणीनंतर सदरील औषध कसे घ्यायचे यांची चौकशी करत असताना त्यांच्याजवळ असलेल्या एका खुर्चीवर पैशाची पिशवी ठेवली होत. त्यावेळेस अज्ञात चोरट्याने येऊन ती पिशवी चोरून नेली.

सदर प्रकार जाधव यांच्या लक्षात येताच डॉ. सोमाणी यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर डॉ.सोमाणी यांनी त्या शेतकºयाच्या मुलाला व पोलिसांना फोन लावून सदरील सर्व घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली व या भागातील सी.सी.टीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास फकरोद्दीन सिद्धीकी करत आहेत.

देशातील १० सर्वाेत्कृष्ठ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या