24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home हिंगोली सेनेचा आंदोलनातून राज्य सरकारला घरचा आहेर

सेनेचा आंदोलनातून राज्य सरकारला घरचा आहेर

एकमत ऑनलाईन

औंढा नागनाथ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी सुरूअसतांना आता औंढ्यात पिक कर्जासाठी शिवसेनेने धरणे आंदोलन करीत राज्यसरकारला घरचा आहेर चढवला आहे. विशेष म्हणजे आंदोलना दरम्यान शिवसेनेचे खा. हेमंत पाटील यांनी हजेरी लावल्याने शिवसैनिकांचे हौसले बुलंद झाले. पण आपल्या सरकार विरोधात आंदोलन करतोय याचे भान मात्र सैनिकाला नव्हते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी काँग्रेसला जुनी खाट कुरकुरते म्हणत सेना नेते शिंगावर घेतात तर कधी बदल्या रद्द करून राष्ट्रवादीसोबत खेटाखेटी चालते. अशात राकॉने पाच नगरसेवकांना प्रवेश दिल्याने कुरबुरी सुरू आहे. नेमके याचवेळी आज औंढा नागनाथ तहसील कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने पिक कर्ज मिळण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनामध्ये उंडेगाव, केळी तांडा नांदखेडा या गावच्या दत्तक बँका बदलाव्यात, दोन ते तीन दिवसांत कर्ज द्यावे, पिक कर्ज मिळण्यासाठी एजंटला १५ ते २० टक्के रक्कम देण्यात यावी द्यावी लागते ही बंद करण्यात यावी, सातबारावर बोजा नसल्यास त्यांना ताबडतोब कर्ज देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनामध्ये जि. प. सदस्य माऊली झटे, माजी कृषी सभापती राजू मुसळे, बबनराव इघारे, नंदकिशोर रवंदळे, रामप्रसाद कदम सह तालुक्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात मास्क व सँनिटायझरचा वापर करीत आगामी काळात शिवसेनेच्यावतीने आंदोलन तीव्र करण्याचा राज्यसरकारला घरचा आहेर देखील चढवला.

औंढा नागनाथ तालुक्यात अनेक गावातील शेतक-यांना पीक कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी पेरलेले बी निघाले नाही तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने दुबार, तीबार पेरणी करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे.

Read More  राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या