22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeहिंगोलीमुलांना रस्त्यावर थांबवुन शिक्षकाने झाडाला घेतला गळफास

मुलांना रस्त्यावर थांबवुन शिक्षकाने झाडाला घेतला गळफास

एकमत ऑनलाईन

हिंगोली (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळदरी शिवारामध्ये दोन मुलांना रस्त्यात दुचाकीवर थांबवून शिक्षकाने बाजूला जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोडबा रामा गायकवाड (३७, रा.गाडी बोरी, ता.हिंगोली) असे या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोडबा गायकवाड हे जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या शाळेला सुटी असल्याने ते त्यांच्या गाडीबोरी या मूळ गावी आले होते. गायकवाड गुरुवारी (दि. २६) सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर दोन मुलांना बसवून भटसावंगी येथे सासरवाडीला सोडण्यासाठी निघाले होते. रस्त्यामध्ये पिंपळदरी शिवारात दुचाकी वाहन थांबवून त्यांनी दोन्ही मुलांना वाहनावर थांबण्यास सांगितले. त्यामुळे मुले वाहनावर बसून होती. त्यानंतर गायकवाड यांनी बाजूला पिंपळदरी शिवारात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, बराच वेळ होऊनही वडील परत न आल्यामुळे मुले रडू लागली. सदर प्रकार रस्त्याने जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पाहिला. त्यांनी विचारणा केल्यावर मुलांनी त्यांचे वडील लघुशंकेला गेल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरात जाऊन पाहणी केली असता गायकवाड यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश भोसले, जमादार नाना पोले, काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गायकवाड यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या