हिंगोली : मागील २९ वर्षापासून चिंतामनी बाप्पाचा मोदकोत्सव दिवसेदिवस अधिक भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे. अनंत चर्तुदशीला जवळपास तीन ते साडेतीन लाख गणेश भक्त मोठ्या श्रध्देन हजेरी लावतात. या उत्सवात हिंगोलीकर देखील सेवाभावाची परंपरा जोपासतात. मात्र पहिल्यादांच यंदा कोरोनाच्या जैविक संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सन १९९१ मध्ये रमाकांत बाबुराव मिस्कीन हे पुणे येथे पाहुण्याकडे गेले असता त्यांना पाहुण्याच्या घरी श्रीला १००८ मोदकाचा नैवेद्य दाखविताना पाहावयास मिळाला. तेव्हा त्यांनी रमाकांत मिस्कीन यांना मोदकांचा प्रसाद एक छोटा गणपती दिला. तेव्हा मनात आले की आपली मनोकामना पूर्ण झाली तर आपण श्रीला १००० मोदकाचा नैवेद्य दाखवू. त्यानंतर रमाकांत मिस्कीन यांची मनोकामना तीन महिन्यात पूर्ण झाली. तदनंतर सन १९९२ च्या गणपती उत्सवाचा आनंद चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता चिंतामणी गणपती व सोबत आलेला एक छोटा गणपती ठेवून पूजा-आरती करून १००८ मोदकाचा महानैवेद्य दाखविला. इथुन सुरु झालेली परपंरा अव्याहतपणे सुरु आहे. आता एक लाखापर्यंत नवसाचे मोदक वाटले जातात. मोदकोत्सवामुळे बाप्पाचे विर्सजन एक दिवस उशीरा होते.
पण ह्या वर्षी करोणाचा पादुर्भाव असल्यामुळे नवसाचे मोदक फक्त १००८ तयार होणार आहे. पारंपारिक पद्धतीप्रमाणे सर्व कार्यक्रम थोडक्यात होणार आहे. श्रीची महापूजा अभिषेक पुरणाच्या पोळीचा नैवेद्य श्रीला दाखवीला जाईल व श्रीला मानाचे डोळे लावले जातात. त्यानंतर तिला १००८ मोदकाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. पण ते नवसाचे मोदक कोणालाही न वाटता सर्वासमोर मंदिरात एक तलाव तयार होणार आणि त्यामध्ये एक हजार मोदकाचा विसर्जन केले जाणार आहे.
नवसाचे मोदक मिळणार किंवा कोणी देत असेल तर अफवाच्या बळी पडू नये. नवस फेडण्यासाठी मंदिरापर्यंत कोणीही येऊ नये किंवा १००० मोदक घेऊन गणपती पर्यंत कोणी पोहोचू नये. कोरोनाचा पादुर्भाव संपल्यानंतर मंदिर उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर पुढे वर्षभर नवस फेडण्यासाठी मंदिर पूर्ण उघडे ठेवण्यात येणार आह. एक वर्षाची सूट दिली जाणार असून नवस वर्षभरात केव्हाही पूर्ण करता येणार असल्याचे समितीने सांगितले.
खबरदारी : लता मंगेशकर याच निवासस्थान असलेल्या प्रभुकुंज सोसायटी सील