36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीबर्निंग ट्रकचा थरार

बर्निंग ट्रकचा थरार

एकमत ऑनलाईन

हिंगोली : दिल्ली येथून व्हिआरएल कंपनीचे दोन ट्रक औेषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तु व इतर साहित्याचे डाग घेऊन हैदराबादकडे निघाले होते. हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याज्वाळ रविवारी (दि.११) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार गावक-यांनी अनुभवला. चालत्या ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकमधील औषधी, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. माळहिवराफाटा येथील गावकरी व अग्नीशमनदलाने आग आटोक्यात आणली.

दिल्ली येथून व्हिआरएल कंपनीचे दोन ट्रक औेषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तु व इतर साहित्याचे डाग घेऊन हैदराबादकडे निघाले होते. आज सकाळी माळहिवरा फाटा पासून काही अंतरावर दोन्ही ट्रक चालकांनी चहा घेतला. त्यानंतर पुढील प्रवासाला निघाले. एक ट्रक पुढे गेला तर दुसरा ट्रक (केए-२५-डी-९४३६) पाठीमागून जात होता. मात्र हा ट्रक माळहिवरा फाट्या जवळ आल्यानंतर ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने अचानक पेट घेतला. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकच्या पाठीमागून येणा-या दुचाकी वाहन चालकाने ट्रक पेटल्याची माहिती दिल्यानंतर चालक गगनदीपसिंह व क्लिनर यांनी ट्रक थांबवून ट्रकमधून बाहेर पडले. त्यानंतर या घटनेची माहिती समोर धावणा-या ट्रकचालकालाही दिली. दरम्यान, ट्रकमधील औषधी, कपडा साहित्यामुळे ट्रकमधून मोठ्या ज्वाला बाहेर पडल्या अन धुराचे लोट उठले होते. त्यानंतर ट्रक चालक व गावक-यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला.

मात्र, इंधन टाकीचा स्फोट होण्याची भितीने गावकरीही ट्रक जवळ जात नव्हते. त्यानंतर या घटनेची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना मिळताच त्यांनी तातडीने हिंगोली नगर पालिकेच्या अग्नीशमन दल घटनास्थळी पाठविले. गावकरी व अग्नीशमनदलाच्या थकाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत ट्रक मधील काही साहित्य जळून खाक झाले तर काही साहित्य पाण्याने भिजून खराब झाले. यामध्ये ट्रक व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

चाकूचा धाक दाखवून सहा तोळे सोने लंपास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या