22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeहिंगोलीग्रीन झोनच्या वाटचालीचे टरबुज फुटले

ग्रीन झोनच्या वाटचालीचे टरबुज फुटले

मुंबईहून वसमतला आलेले ८ जण पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

हिंगोली/प्रतिनिधी
मागील चार दिवसापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट होत हिंगोलीची ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. काल अवघे सात रुग्ण राहील्याने आता दोन दिवसात जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाईल अशी अपेक्षा असतांना आज टरबुज फुटले आणी वसमतला आठ जण पॉझिटीव्ह निघाले.

Read More  अशी ही बनवाबनवी!

कोरोनाच्या धास्तीने हॉटस्पॉट भागातून मजूर आपल्या गावाकडे परत येत आहेत. मुंबई येथून आपल्या गावी आलेल्या ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे सर्व रुग्ण वसमत तालुक्यातील आहेत. प्रशासनाने सदर रुग्णांना वसमत तालुक्यात येताच विलग केल्यामुळे हे रुग्ण इतरांमध्ये मिसळले नाहीत आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या रुग्णाचे अहवाल आज प्राप्त झाल्याने हिंगोलीकराची चिंता पुन्हा वाढली आहे. पॉझिटीव्ह रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ वरून नुकतीच ७ एवढी झाली आहे. त्यात आता या ८ रुग्णांची भर पडली असल्यामुळे आता हिंगोलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ वर पोचला आहे. परिणामी हिंगोली जिल्ह्याचे ग्रीन झोनच्या दिशेने जाणारे टरबुज फुटले.

Read More  परभणीला मुंबईवरून आलेल्या ‘त्या’ महिलेला कोरोनाची लागण

आता जिल्हा पुन्हा आॅरेंज झोनमधून रेड झोनकडे जातो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात यानंतरही पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी हॉटस्पॉट ठरलेल्या भागातून मोठ्या संख्येने रुग्ण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मजुरांपासून सुरक्षित राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आज घडीला बाहेरून हिंगोली जिल्ह्यात दाखल झालेल्या सुमारे १७ हजार मजुरांना प्रशासनाच्या वतीने त्यांच्या गाव परिसरातच सुरक्षित ठिकाणी विलगी केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने अचूक खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

परजिल्ह्यातून आलेले १७ हजार क्वारंटाईन
कोविड-१९ या विषाणु जन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीसºया टप्यातील लॉकडाऊन संपून चौथा टप्पा सुरू होत आहे. अशात परिजिल्ह्यातून येणाºयांची संख्या वाढली आहे. सध्यस्थितीत १७ हजार १२९ जण होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहेत. यापैकी अनेकजण नियम पाळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, मालेगाव यासह काही जिल्हे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबई व पुणे या ठिकाणी अडकलेले अनेकजण हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणचे अनेकजण मागील आठवराभरात आपल्या मुळ गावी दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणावरुन स्थलंतारीत होत असलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोणतेही लक्षणे नसल्यास त्यांना गावी जाण्यास मुभा देण्यात येत आहे.

गावी आल्यानंतर व्हीव्हीआरटी समितीमार्फत त्यांची नाव नोंदणी करुन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे असे लक्षणे आढळल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात येते. अशांचे थ्रोट स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले जातात. कोरोना सदृष्य कोणतेही लक्षणे नसलेल्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारला जात आहे. तसेच त्यांच्या घरावर रेड स्टिकर चिटकवले जात आहे. १४ दिवस अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व समितीतील सदस्यांकडुन त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या