20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, एका रुग्णाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, एका रुग्णाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

हिंगोली, (जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात आज कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 02 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे व 09 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 05 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 01 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 06 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 960 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 565 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 09 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 386 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या