24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeहिंगोलीचाळ न मिळाल्याने तिनशे क्विंटल कांदा उघड्यावर!

चाळ न मिळाल्याने तिनशे क्विंटल कांदा उघड्यावर!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कांदा उत्पादकांसाठी कृषी विभागाकडून योजनेतंर्गत कांदा चाळीचा लाभ देण्यात येत असतो. परंतु, वारंवार येरझारा, विनंत्या करूनही कृषी विभागाकडून कांदा चाळ न मिळाल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील निशाना येथील अल्पभूधारक शेतक-याचा तीनशे क्विंटल कांदा उघड्यावर पडला आहे. यातून शेतक-यास मोठा फटका बसण्याची शक्यता असून, कृषी विभागाकडे अनेक वेळा मागणी करूनही कांदा चाळ देण्यात आली नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी माग्णाी शेतकरी गजानन सावळे यांनी केली आहे.

औंढा नगनाथ तालुक्यात शेतक-यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. निशाना येथील अल्पभुधारक शेतक-यास तिनशे क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले. परंतु साठविण्यास जागा नसल्याने कांदा चाळ मिळण्यासाठी शेतक-यांला प्रयत्न करावे लागत आहेत. निशाना येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन लक्ष्मण सावळे यांनी यावर्षी दोन एकर शेतामध्ये कांदा पिक घेतले. कांद्याची भरपुर सोय केल्यामुळे दोन एकर शेतामध्ये जवळपास तिनशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले. पण कांदा साठवण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे व कृषी विभागाकडे गेल्या वर्षीपासुन कांदाचाळ मिळण्यासाठी प्रयत्न केले.

पण कृषी विभागाकडून कांदा चाळ न मिळाल्याने निशाना येथील शेतकरी गजानन सावळे यांचा सर्व कांदा उन्हातच आहे. तरी संबंधित विभागाने कष्टकरी शेतक-यांना शासनाकडुन मिळणा-या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निशाणा येथील अल्पभुधारक शेतकरी गजानन सावळे यांनी कृषी विभागाकडे केली आहे

रूग्णाच्या नातेवाईकाने व्हेन्टीलेटरची काच फोडली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या