35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home हिंगोली कुरुंदा येथे दिवसाढवळ्या दोन लाखांची चोरी

कुरुंदा येथे दिवसाढवळ्या दोन लाखांची चोरी

एकमत ऑनलाईन

वसमत : कुरुंदा येथील निवृत्त शिक्षक प्रलाद गुळगुळे हे आपल्या मुलांच्या किराणा दुकानातून बँकेत तीन लाख ७५ हजार रुपये जमा करण्यासाठी जात असताना दुचाकीस्वार चोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि देशी दारूच्या दुकानासमोर त्यांची अडवणूक करून त्यांच्याजवळील बॅग मधली दोन लाख रुपये हिस्काटून घेऊन पळ काढला. या घटनेने कुरुंदा येथील व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरुंदा येथे चोरी करणारे चोरांनी वसमत येथील ज्वेलरी शॉप येथेदेखील चोरी करून आल्याची चर्चा सुरू आहे. कुरुंदा येथील निवृत्त शिक्षक प्रलाद गुळगुळे हे त्यांच्या मुलांच्या राज कुमार किराणा दुकानातून तीन लाख ७५ हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी जात असताना दुचाकीस्वार चोरांनी मी शासकीय क्राईम ब्रँच कर्मचारी आहे आणि तुम्ही बॅगमध्ये गांजा घेऊन जात आहे का तुमची बॅग मला तपासायची आहे असे सांगून दुचाकीस्वारांनी निवृत्त शिक्षक गुळगुळे यांच्या जवळील छोटी बॅग उघडून पाहून त्यातील दोन लाखाच्या बंडलावर हात घालून हिस्काटून घेतले त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्या हातातील बॅग सोडून दिली आणि बिना नंबरच्या दुचाकीवरून पळ काढला उर्वरित एक लाख ७५ हजार रुपये त्यांच्या पिशवीत सुरक्षित राहिले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वसमत येथील डी वाय एस पी हाश्मी आणि एलसीबी कर्मचारी खंडेराय सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी घटनास्थळी पाहणी केली असून सध्या निवृत्त शिक्षक गुळे यांना विचारपूस करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकरणात चोरांचा तपास घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर, केंद्रे, बालाजी जोगदंड, आमले, सोनवणे, सिद्दिकी, माजिद शेख ,भोपे गजानन, पटवे, ग्यादमवाड राठोड हे परिसरात चोरट्यांचा शोध घेत आहे . कुरुंदा येथे मागील चार-पाच वर्षापासून अशा प्रकारच्या घटना दरवर्षी घडत आहे .त्यामुळे कुरुंदा येथील व्यापारी वर्गात असुरक्षितता भासत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परभणीत महामंडळ बसेसवर चिटकवल्या संभाजीनगरच्या पाट्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या