31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत दुचाकी चोर मामा, भाच्यांचा धुमाकूळ

हिंगोलीत दुचाकी चोर मामा, भाच्यांचा धुमाकूळ

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यातून मागील काही दिवसांत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस अधिक्षक कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, ज्ञानेश्वर सावळे, शंकर जाधव, किशोर सावंत, सुनील अंभोरे, भगवान आडे, विलास सोनवणे यांची दोन पथके स्थापन केली होती.

या पथकाने मागील तीन दिवसांपासून माहिती घेत गडदगव्हाण येथील एकास ताब्यात घेतले. राजू उर्फ सचिन खिल्लारे असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजू व त्याच्या मामाने मराठवाडा व विदर्भातील काही जिल्हयांमधून २९ वाहने चोरी केली आहेत. सदर वाहने बनावट कागदपत्रे तयार करून त्याची कमीकिंमतीत विक्री केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी राजू खिल्लारे याची चौकशी केली असता त्याने सदर वाहने मामाने चोरून आणून दिल्याचे स्पष्ट केले. मात्र वाहने कुठून चोरली याची माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

त्यावरून आता पोलिसांनी त्याच्या मामाचा शोध सुरु केला असून त्यानंतरच किती जिल्हयातून ही वाहने चोरली याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर प्राथमिक चौकशीमध्ये परभणी, नांदेड, वाशीम, हिंगोली, रिसोड या भागातून वाहने चोरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मर्चा­यांनी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी पथकातील अधिकारी, कर्मचा-यांचे कौतूक केले आहे.

लातूर जिल्हयात पूरेशा प्रमाणात रेमडेसीवीर औषध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या