26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeहिंगोलीभारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत

भारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत

एकमत ऑनलाईन

हिंगोली : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यात दाखल झाली. ही भारत जोडो यात्रा ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली जिल्ह्यातील हिवरे/चोरांबा फाटा येथे दाखल झाली. या ठिकाणी उभारलेल्या भव्य प्रवेशद्वारावर लातूर व हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख, आमदार प्रज्ञाताई सातव, वर्षा गायकवाड, अमर राजूरकर, माजी आमदार भाऊराव पाटील यांच्यासह लातूर-हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत केले.

लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून सहभाग नोंदवला. या ठिकाणाहून चालत असतांना रस्त्याच्या दुतर्फा गर्दीसह हजारोे लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला. संस्कृतीचे दर्शन घडवणा-या विविध कलापथकांनी सादरीकरण केले. ढोल- ताश्या, लेझीम अशा विविध वाद्य प्रकारांच्या निनादाने तसेच राहुलजी गांधी यांच्या विजयाच्या घोषणामुळे काही काळ हा परिसर दणाणून गेला होता.

या यात्रेत युवा सेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, हुसेन दलवाई, सतेज पाटील, खासदार रजनी पाटील, खासदार कुमार केतकर, खासदार सुरेश धानोरकर, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, राजेश राठोड, बी. जी. कोळसे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, भाई जगताप, सत्यजित तांबे, इम्रान प्रतापगडी, अमर राजूरकर, डी. पी. सावंत, विलास अवताडे, सिद्धार्थ हत्तीआंबिरे, आशिष दुवा, संपत कुमार, हुसेन दलवाई, मोहन जोशी, अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागून देशाची एकात्मता अधिक मजबूत व्हावी, म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेस प्रारंभ झाला आहे, विविधतेतून एकता साधणा-या या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशभरातून ३७५० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत.

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड जिल्ह्यातील चार दिवसाच्या प्रवासानंतर ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सदरील यात्रा हिंगोली जिल्ह्यात हिवरे/चोरांबा फाटा येथे प्रवेश केला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व जनतेने या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत केले. यानंतर पुढे भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. हिंगोली जिल्ह्यात ही यात्रा ४ दिवसांचा प्रवास करून पुढे वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेला लातूरसह राज्यातील कानाकोप-यातील जनतेतून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले.

लातूर जिल्ह्यातून माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, अशोकराव पाटील निलंगेकर, किरण जाधव, दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, विजयकुमार साबदे, श्रीशैल उटगे, रवी काळे, विजय देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, समद पटेल, राजेश्वर निटुरे, यशवंतराव पाटील, मोहन माने, गोरोबा लोखंडे, सिकंदर पटेल, प्रा. स्मिताताई खानापुरे, सपनाताई किसवे, विद्याताई पाटील, स्वाती जाधव, प्रीती भोसले, सूर्यशीला मोरे, सूर्यकांत कातळे, दिलीप देसाई, कैलास कांबळे, युनूस मोमीन, प्रमोद जाधव, अभय सांळुंके, प्रवीण पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, आसिफ बागवान, इम्रान सय्यद, सचिन मस्के, राजकुमार जाधव, ज्ञानेश्वर सागावे, पंडित कावळे, फारूक शेख, रघुनाथ मदने, कैलास पाटील, गोटू यादव, राजू गवळी, वेंकटेश पुरी, प्रा. शिवाजीराव जवळगे, प्रा. माधव गादेकर, गोविंद बोराडे, बाळासाहेब बिडवे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, दगडूअप्पा मिटकरी, देविदास बोरूळे पाटील, सुमित खंडागळे, हकीम शेख, गौरव काथवटे, सचिन बंडापल्ले, प्रताप पाटील, महादेव ढमाले, तबरेज तांबोळी, महेश काळे, हरिभाऊ गायकवाड, अभिजित इगे, सुनील पडिले, प्रा. संजय ओहोळ, सुंदर पाटील कव्हेकर, गिरीश ब्याळे, असिफ बागवान, राम कोंबडे, इसरार सगरे, डॉ. बालाजी साळुंके, पप्पू देशमुख, अकबर माडजे, एकनाथ पाटील, विकास कांबळे, सुरेश गायकवाड, वर्षा मस्के, सुभाष घोडके, दगडूसाहेब पडिले, हकीम शेख, शरद देशमुख, मनोज देशमुख, रिहाना बासले, संजय पाटील, विजय टाकेकर, रफिक सय्यद, प्रा.एम. बी. पठाण, एम. पी. देशमुख, बिभीषण सांगवीकर, सुमन चव्हाण, कमल शहापुरे, यशपाल कांबळे, बानू शेख, हरून बासले, अविनाश बट्टेवार, करीम तांबोळी, सुभाष जाधव, अभिषेक पतंगे, सुलेखा कारेपूरकर, केशरबाई महापुरे, विवेक जगताप, राहुल डुमने, अब्दुल्ला शेख, नितीन कांबळे, राज क्षीरसागर, प्रा. सुधीर आनवले, आनंद वैरागे, आकाश मगर, पवन सोलंकर, विष्णू धायगुडे, बालाजी झिपरे, पवनकुमार गायकवाड, अंगद गायकवाड, फारुख शेख, श्रीकांत गर्जे, गणेश देशमुख, धनंजय शेळके, सत्यवान कांबळे, केतन सातपुते, कुमारअप्पा पारशेट्टी, जफर पटवेकर, शिवाजी कांबळे, गोविंद देशमुख, सुरेश धानुरे, प्रा. शिवाजी जवळगेकर, रघुनाथ शिंदे, गोविंद डुरे पाटील, ज्योती सिंघन, अनिता रसाळ, उषा चिकटे, शितल मोरे, संगीता पतंगे, सुधाताई कावळे, किरण बनसोडे, दयानंद कांबळे, महादेव सुर्यवंशी, कैलास माने, वैभव स्वामी, खाजा शेख, रामराव चामे, डॉ. सुधाताई कांबळे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या सर्वांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालण्याचा ऐतिहासीक क्षण अनुभवला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या