हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना पाच दिवसापुर्वी सिझेरीयन करुन प्रसुत झालेल्या १९ वर्षीय ओल्या बाळंतीनीला चक्क रुग्णालयातुन हाकलण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात आज दुपारी घडला.
वसमत शहरातील महिला २२ जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय स्त्रि रुग्णालयात दाख़ल झाली होती़ सिझेरीयन करीत प्रसुतीनंतर तिला कन्यारत्न प्राप्त झाले़ कन्यारत्न झाल्याने कुटुंबीय आंनदात होते़ मात्र अचानक आज दि़ २७ जूलै रोजी सोमवारी सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालय धडकले़ यानंतर पाच दिवसाच्या ओल्या बाळंतीनीला चक्क एका अॅटोमध्ये बसवुन उपजिल्हारुग्णालयात हकलले़ हा प्रकार पाहुन ओली बाळंतीन भांबावुन गेली.
वास्तवीक कोरोनाच्या लढयात डॉक्टर, नर्सेस आणी आरोग्य यंत्रनेला देवस्वरुप स्थान दिले जात असतांना हा संतापजनक प्रकार घडावा हे निंदनीय आहे़ स्त्री रुग्णालयातुन प्रसुती झालेली महिला अॅटोतुन आल्यानंतर तिथे बाळंतीनीसमोर प्रश्नाची सरबत्ती सुरु झाली़ तुम्ही बाळंतीन असतांना इथे कशाला आल्या म्हणत महिला पुन्हा महिला त्याच अॅटोतुन महिला रुग्णालयात पाठविले.
हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरताच रुग्णवाहीका बोलावुन महिलेला उपजिल्हा रुग्णालयात रेफर करुन भरती करुन घेतले़ आता महिलेच्या सोबतच्या नातेर्वाकांना क्वारंटाईन होण्याचा सुचना देण्यात आल्या असुन अॅटोचालकांचा शोध सुरु झाला आहे.
दरम्यान स्त्रि रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाने कोरोचा प्रादुर्भाव वाढवून नागरिकांचे जीव धोक्यात आणल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष नदीम सौदागर एमआयएमचे युवक शहराध्यक्ष पठाण इरफान खान शेख समीर शेख अक्रम यांनी केली आहे.
Read More कोरोनापेक्षा क्वारंटाईन सेंटरचीच भिती वाटते!