33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home हिंगोली हिंगोलीत पालीका कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

हिंगोलीत पालीका कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

एकमत ऑनलाईन

हिंगोली : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी सफाई कामगार संघटनेच्यावतीने आज १७ ऑगस्ट रोजी एक दिवशी काम बंद आंदोलन संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

आंदोलनाच्या माध्यमाने ­ सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे, शंभर टक्के वेतन शासनाच्या कोषागार कार्यालयातून देण्यात यावे, नगर परिषद पंचायतीच्या कर्मचा-यांचे एकाच वेळी समावेशन करणे, रोजंदारी कर्मचा-यांचे एकाच वेळी समावेशन करणे, अभियंता अग्निशमन दल लेखा व अधिका-यांना प्रशासकीय सेवांच्या निवड श्रेणी लागू करणे, नगरपरिषद कर्मचा-यांचा आकृतिबंध आराखडा तयार करणे, सफाई कर्मचा-यांना मोफत घर बांधून देणे, सफाई कर्मचा-यांना शासकीय सुट्टी तसेच रविवार शनिवार सुट्टी लागू करण्यात यावी, स्वच्छता निरीक्षकांचा संवर्ग तयार करणे, २००५ च्या कर्मचा-यां जुनी पेन्शन योजना लागू करणे, अशा विविध मागण्या करण्यात आले. यावेळी राज्यध्यक्ष विश्वनाथ घुगे, अभियंता रत्नाकर अडसरे, जिल्हाध्यक्ष बाळू बांगर, श्याम माळवटकर, संदीप घुगे, विजय खिलारे, मुंजाजी बांगर यांच्यासह इतर कर्मचारी व महिला कर्मचा-यांचा सहभाग होता.

शहरात अंडरग्राऊंड वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव तयार करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या