34.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा विकला

पाकिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा विकला

पाक अधिका-याने १ कोटी रुपयांची लाच घेतली पाडण्याची परवानगी दिली; खरेदीदार २ पत्नींसाठी बुटीक बनवत आहे

लुधियाना : पाकिस्तानमध्ये शीख आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांना सातत्याने नुकसान पोहोचवले जात आहे. अलीकडेच, पाकिस्तानमधील एबटाबाद शहरातून गुरुद्वारा साहिबची इमारत पाडल्याचा आणि जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे.

खालसा वोक्सच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एबटाबाद येथील ऐतिहासिक गुरुद्वारा इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डच्या एका अधिका-याने एक कोटी पाकिस्तानी रुपयांची लाच घेऊन विकला आहे. इतकेच नाही, तर अधिका-याने गुरुद्वारा साहिब पाडण्याची परवानगीही दिली.

आता त्याचा खरेदीदार येथे आपल्या पत्नींसाठी बुटीक बनवत आहे. सांगायचे म्हणजे, पाकिस्तानमध्ये ईटीपीबीही अल्पसंख्याक समुदायांच्या गुरुद्वारा, मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळांच्या देखभालीसाठी जबाबदार संस्था आहे. पाकिस्तानमध्ये जेवढेही अल्पसंख्याक समुदाय आहेत, त्यांच्या धार्मिक स्थळांची देखरेख करण्यासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली होती.

गुरुद्वारा साहिबला बुटीकची परवानगी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटोक जिल्ह्यातील हसन अब्दाल येथील ईटीपीबी प्रशासकाने शीख राजवटीत बांधलेल्या गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, एबटाबादचा ताबा वाहिद बाला नावाच्या एका स्थानिक रहिवाशाला दिला. अधिका-याने कथितरित्या गुरुद्वारा पाडून त्या जागी कपड्यांचे बुटीक बनवण्याची परवानगीही दिली.

दोन पत्नींच्या नावावर केली
गुरुद्वारा सिंह सभाची जमीन खरेदी करणा-याचे नाव वाहिद बाला असल्याचे सांगितले जात आहे, ज्याने ही जमीन आपल्या दोन पत्नी रिदा जादून आणि आयशा वाहिद यांच्या नावावर केली आहे. आता त्या लवकरच येथे आपले बुटीक सुरू करणार आहेत.

ईटीपीबी अधिका-याला बडतर्फ करण्याची मागणी
पाकिस्तानमध्ये राहणा-या शिखांनी गुरुद्वारा साहिब विकण्याची आणि तो पाडण्याची परवानगी देणा-या ईटीपीबी अधिका-याला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी गुरुद्वारा साहिबची इमारत वाचवण्याची मागणीही सरकारकडे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR