नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (३० डिसेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडिया हा सामना तीन धावांनी हरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
पहिला सामना त्यांनी सहा विकेट्सनी जिंकला. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर ५, ७ आणि ९ जानेवारीला तीन टी-२० सामने खेळवले जातील. भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. तिने सचिन तेंडुलकरच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये ५ विकेट्स घेणारी दीप्ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लिचफिल्डने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण पदार्पण करणा-या श्रेयंका पाटीलने त्यांना ६३ धावांवर रोखले. यानंतर दीप्तीने ऍलिस पेरी, बेथ मुनी, तालिया मॅकग्रा, ऍनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहम या महत्त्वाच्या खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
दीप्ती शर्माच्या पाच विकेट्समुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला केवळ २५८ धावांवर रोखले. दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नुशीन अल कादिरचा विक्रम मोडला. कादिरने १० षटकांत ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या तर दीप्तीने १० षटकांत केवळ ३८ धावा देत पाच विकेट्स घेतल्या.