26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रएकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली?

एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली?

मुंबई : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. अहमदाबादवरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यावर काही मिनिटांतच ते कोसळले. मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, त्यासंदर्भात देश-विदेशातील एजन्सी एकत्र तपास करत आहेत. ड्रीमलायनरचा व्यवहार झाला होता तेव्हा भाजपाने त्याच्या क्षमतेविषयी, इंजिनाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. कारण यूपीए सरकारच्या काळात ही खरेदी झाली. नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना तेव्हा वारंवार खुलासा करावा लागत होता. अपघात झाल्यावर तपास सुरू आहे. मुळात हा अपघात झाला कसा? हे सिव्हिल एव्हिएशनला क्षेत्राला पडलेले कोडे आहे.

३० सेकंदामध्ये काय घडले?
३० सेकंदामध्ये हे घडले कसे? एकाच वेळेला दोन इंजिन कशी बंद पडली? कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. आपण त्यातले एक्सपर्ट नाही. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जे सायबर हल्ले होत आहेत. ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. या सगळ्याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणेयोग्य नाही. दुर्दैवाने २७० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. एक्स्पर्ट वेगवेगळे अँगल्स देत आहेत, त्याचा तपास होईल असे राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR