Homeअंतरराष्ट्रीयचीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी

चीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी

अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?

बीजिंग : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच, ड्रॅगन म्हणजेच चीन एक वेगळीच खेळी खेळत आहे. चीन सध्या पिसाटल्यासारखी सोन्याची आणि चांदीची खरेदी करत आहे. या खरेदीमागे चीनचा एक मोठा सीक्रेट प्लॅन असून तो थेट अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ठरू शकतो.

इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर आणि डॉलरच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वत:ची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी चीन आपल्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहे. सोन्याचा साठा वाढवून चीन आपल्या चलनाला (युआन) अधिक मजबुती देऊ पाहत आहे.

चांदीबाबतचा गुप्त प्लॅन
चीन केवळ सोनेच नाही, तर चांदीचीही मोठ्या प्रमाणावर साठवणूक करत आहे. चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठी नाही, तर सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. भविष्यातील तंत्रज्ञानावर कब्जा मिळवण्यासाठी चीनने चांदीचा साठा करण्याचा सपाटा लावला आहे.

डॉलरच्या साम्राज्याला सुरुंग?
जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. युद्धजन्य परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यास, सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था अधिक शक्तिशाली ठरेल, असे चीनचे गणित आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधांमधून धडा घेत चीन आपली संपत्ती डॉलरऐवजी सोन्यात रूपांतरित करत आहे.

गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
चीनच्या या मोठ्या खरेदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडले असून चांदी देखील नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. यामुळे भारतीय बाजारातही दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR