परभणी : तालुक्यातील सावंगी खुर्द येथील ५० शेतक-यांना २०२२-२३ चे दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. संबंधीत शेतक-यांना हे अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. अन्यथा या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनिल पंढरकर यांनी परभणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावंगी खूर्द येथील जवळपास ५० शेतकरी २०२२-२३च्या दुष्काळी अनुदानापासून वंचित राहीले आहेत. संबंधीत शेतक-यांचे खाते नंबर व आधार नंबर आपल्या कार्यालयास देण्यात येत असून त्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात यावे. अन्यथा या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनिल पंढरकर, गजानन पंढरकर, बबनराव गोफणे, मुंजाजी पंढरकर, प्रभाकर पंढरकर, कुंडलीक पंढरकर, कृष्णा पंढरकर आदिंच्या स्वाक्षरी आहेत.