नवी दिल्ली : देशात सतत मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. दिल्लीमध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले होते. सुमारे ३० मुलींच्या आयुष्याशी खेळणारा सिरियल किलर रविंदर कुमारने पहिल्या मुलीला आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी बळी बनवले तेव्हा तो अल्पवयीन होता.
रविंदरने ७ वर्षांत ३० मुलींवर बलात्कार केला आणि त्यांना ठार मारले. त्याने बहुतांश बलात्कार दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात केले.
गायब होणा-या मुलींचे मजुरी करणारे पालक एकदा पोलिसांकडे तक्रार घेऊन जात, पण नंतर त्याचा पाठपुरावा करत नसत. याचा फायदा रविंदर घ्यायचा. त्याने काही मुलींना वासनेचे बळी बनवून पुरले, तर काहींना नाल्यात फेकून दिले. वर्षे निघून गेली आणि त्याच्या क्रूर कृत्यांचे बळी वाढत गेले, पण कोणालाच याची जाणीव झाली नाही. पोलिस तपासाच्या माध्यातून रविंदर कुमारपर्यंत पोहोचले. त्याला अटक झाली. चौकशीदरम्यान जे खुलासे झाले, त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
रविंदरच्या निशाण्यावर मुख्यत: ६ ते १२ वर्षे वयाच्या मुली होत्या. जेव्हा त्याला पहिल्यांदा पकडले गेले, तेव्हा फक्त एका हत्येचा तपास सुरू होता. पण रविंदरने स्वत: तोंड उघडून भयानक सत्य उघड केले. तो म्हणाला मी मुलांचे अपहरण केले, बलात्कार केला आणि मग त्यांना ठार मारले. अगदी प्रेतावरही बलात्कार केला. मला यात मजा यायची. २००८ मध्ये रविंदर उत्तर प्रदेशच्या कासगंजमधून दिल्लीला आला होता.
तेव्हा त्याचे वय १८ वर्षे होते. त्याचे वडील प्लंबरचे काम करायचे आणि आई लोकांच्या घरात जेवण बनवणे आणि साफसफाईचे काम करायची. दिल्लीत आल्यानंतर तो दारू आणि ड्रग्सच्या आहारी गेला होता. त्याचबरोबर त्याला पॉर्न व्हीडीओ पाहण्याचे व्यसन लागले. त्याने सांगितले की, तो रोज संध्याकाळी दारू प्यायचा किंवा ड्रग्स घ्यायचा आणि मग आपले टार्गेट म्हणजेच अल्पवयीन मुलांच्या शोधात निघायचा. यासाठी तो एका दिवसात ४० किमीपर्यंत पायी चालायचाही. सर्वप्रथम त्याने २००८ मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पहिल्यांदा गुन्हा करून पकडले न गेल्याने त्याचे धाडस वाढले. मग हा त्याचा रोजचा क्रम बनला.
















