‘विजय मुख्यमंत्री झाल्याचं ऐकून मला प्रचंड धक्का बसला होता’; रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टच सांगितलं!

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयने (Vijay) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी अभिनंदन केले नव्हते आणि ते विजयवर जळतात, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांवर आणि अफवांवर मौन सोडत सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या निवासस्थानी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि यावर जाहीर स्पष्टीकरण दिले.

पत्रकार परिषदेत बोलताना रजनीकांत म्हणाले, “जेव्हा मला पहिल्यांदा समजलं की विजय मुख्यमंत्री झाला आहे, तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता (I was extremely shocked). पण तो धक्का आनंदाचा आणि आश्चर्याचा होता. मी राजकारणात नाही, मी खूप वर्षांपूर्वीच राजकारण सोडलं आहे. त्यामुळे मी विजयवर जळावे असं काहीच कारण नाही.”

रजनीकांत यांनी विजयच्या या ऐतिहासिक विजयाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “विजय आणि माझ्यात २५ ते २८ वर्षांचे जनरेशन गॅप (वयाचे अंतर) आहे. आमच्यात कसलीही स्पर्धा नाही. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विजयने जे यश मिळवले आहे, ते एमजीआर (MGR) आणि एनटीआर (NTR) यांच्यापेक्षाही मोठे आहे. केंद्रामध्ये सत्ता असलेल्या भाजप आणि राज्यातील दोन बलाढ्य द्रविडीयन पक्षांसोबत (DMK आणि AIADMK) एकट्याने लढा देऊन विजयने हे यश मिळवले आहे. मला त्याचा अत्यंत अभिमान आणि आनंद आहे.”

निवडणूक निकालानंतर रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची भेट घेतली होती. त्यावरही टीका झाली होती की रजनीकांत हे विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी स्टालिन यांना भेटले. यावर स्पष्टीकरण देताना रजनीकांत संतापले आणि म्हणाले, “रजनीकांत हा इतका स्वस्त किंवा खालच्या पातळीचा माणूस नाही की तो कोणाबद्दलही अशी चर्चा करेल. स्टालिन आणि माझी मैत्री गेली ४० वर्षे आहे. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. निवडणुकीत हार-जीत होतच असते. स्टालिन यांचा पराभव झाल्याने मला मित्र म्हणून वाईट वाटले, म्हणून मी त्यांची भेट घेतली. जर मी आज पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले नसते, तर लोकांनी त्याच खोट्या अफवांना सत्य मानले असते.”

एअरपोर्टवर पत्रकारांनी विजयच्या मुख्यमंत्री होण्यावर प्रश्न विचारला असता रजनीकांत यांनी केवळ हात जोडून स्मितहास्य केले होते, त्यावरही वाद निर्माण झाला होता. त्यावर बोलताना रजनीकांत म्हणाले, “असं म्हटलं गेलं की मी एअरपोर्टवर विजयचे अभिनंदन केले नाही. पण विजयचा विजय निश्चित होताच मी सर्वात आधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट लिहून त्याचे आणि त्याच्या पक्षाचे अभिनंदन केले होते. कदाचित कमल हासन मुख्यमंत्री झाले असते तर मला हेवा वाटला असता (हसत), पण विजय तर माझ्या मुलासारखा आहे.” शेवटी, “निवडणुकीत कोणाच्या नशिबात काय लिहिले आहे ते घडतेच. विजयकडून तामिळनाडूच्या जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि तो त्या नक्कीच पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत रजनीकांत यांनी मुख्यमंत्री थलपथी विजय यांना आपल्या शुभेच्छा दिल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news