32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंना काहीच कसे वाटत नाही

ठाकरेंना काहीच कसे वाटत नाही

जळगाव : उद्धव ठाकरे तुम्हाला काहीच वाटत नाही का, ज्यांच्याविरोधात बाळासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य वेचले त्या पंज्याला मतदान करण्यासाठी चालला आहात. काँग्रेसने आमच्यावर केसेस टाकल्या त्यांना मतदान टाकणार का, असा बोचरा सवाल राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तेव्हा संजय राऊत नावाचे बारदान नव्हते, आम्ही होतो, सातपूरचे लोक. तिकडे हात वेगळे, पाय वेगळे, शरीर वेगवेगळ्या पक्षाचे आहे. इथे टॉप टू बॉटम एकच मॉडेल आहे. या सरकारची नियत चांगली आहे.

मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही. नाशिकला पट्टी लावल्याशिवाय जाता येत नव्हते. आता फाईव्ह स्टार रेल्वे स्टेशन होतेय. रस्ते टकाटक झाले आहेत, असे पाटील म्हणाले. याचबरोबर आता फटाक्यांचा आवाज आला तरी यात आमचा हात नाही हे सांगावे लागत आहे. असा दमदार पंतप्रधान आहे. ही शिवसेना संजय राऊत यांना कधी समजली, त्यांच्यावर एक तरी केस आहे का, असा सवाल करत दिनकर पाटील आणि करंजकर यांनीच खासदारकीसाठी हेमंत गोडसे यांचे नाव सुचविले होते, असा दावा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR