केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताकडून के. एल. राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने शतक झळकावले. मात्र, तो भारताचा डावाने पराभव टाळू शकला नाही. के. एल. राहुल अलीकडेच पत्नी अथिया शेट्टीकडून दुखापत आणि रिकव्हर होताना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल बोलून गेला.
दरम्यान, सुनील गावसकर यांनी लोकेश राहुलच्या शतकाला भारताकडून कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च १० शतकांपैकी एक म्हटले आहे. के. एल. राहुलने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी केली होती.
राहुल आणि अथियाचे २०२३ मध्ये लग्न झाले. अथिया ही बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सुनील शेट्टी याची मुलगी आहे. तो म्हणाला की, ती माझ्यासोबत होती, प्रत्येक गोष्टीत ती माझ्यासोबत असायची. बहुतेक दिवस ती माझ्यापेक्षा जास्त निराश आणि रागावलेली होती. म्हणून, मी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.
के. एल. पुढे म्हणाला की, खेळामध्ये पुनरागमन आम्हा दोघांसाठी हे अवघड होते, पण त्यामुळे आम्हाला आवश्यक असलेला वेळही मिळाला.
मला असे वाटले की मला पुन्हा त्याच प्रक्रियेकडे परत जावे लागेल. मला नकारात्मकता जाणवत होती. मी फक्त आनंदी राहिलो आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद लुटला आणि घरी राहणे, माझ्या पत्नीसोबत राहणे, माझ्या कुटुंबासोबत असण्याचा आनंद घेतला, ज्यामुळे मला बरे होण्यास आणि खूप लवकर परत येण्यास मदत झाली.
के. एल. राहुलने खुलासा केला की, तो मैदानावर असताना पत्नीचा विचार करत नाही. त्याचे रहस्य उघड करताना तो म्हणाला की, ती मला मारून टाकेल, पण मी मैदानात उतरल्यावर तिच्याबद्दल विचार करत नाही. हे फक्त क्रिकेटबद्दल आहे. मला हे अनरोमँटिक पद्धतीने म्हणायचे नाही. ती माझ्यासाठी काय करते, ती माझ्यासाठी जीव ओवाळून टाकण्यासही तयार असते. ती मला खूप प्रेम देते.