26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeराष्ट्रीयअमेरिकेच्या विरोधात असाल तर व्हिसा रद्द

अमेरिकेच्या विरोधात असाल तर व्हिसा रद्द

एच-१बी व्हिसा सोशल मीडिया खात्याच्या तपासणीनंतरच मिळणार १५ डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमांमध्ये कठोरता आणण्याचे आदेश दिले आहेत. एच-१बी अर्जदारांना त्यांचे सोशल मीडिया खाते सार्वजनिक करावे लागेल, जेणेकरून अमेरिकन अधिकारी अर्जदाराचे प्रोफाइल, सोशल मीडिया पोस्ट आणि लाइक्स पाहू शकतील.

जर अर्जदाराची कोणतीही सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात दिसली, तर एच-१बी व्हिसा जारी केला जाणार नाही. एच-१बीच्या आश्रितांसाठी (पत्नी, मुले आणि पालक) एच-४ व्हिसासाठी देखील सोशल मीडिया प्रोफाइल सार्वजनिक करणे आवश्यक असेल. एच-१बी व्हिसासाठी सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी आवश्यक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन नियम १५ डिसेंबरपासून लागू होतील. ट्रम्प प्रशासनाने सर्व दूतावासांना निर्देश जारी केले आहेत.

ऑगस्टपासून स्टडी व्हिसा एफ-१, एम-१ आणि जे-१ तसेच व्हिजिटर व्हिसा बी-१, बी-२ साठी सोशल मीडिया प्रोफाइल सार्वजनिक करण्याची सक्ती लागू करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा एच-१ बी व्हिसाबाबत ९ वर्षांत कधी हो, कधी नाही असा दृष्टिकोन राहिला आहे. पहिल्या कार्यकाळात २०१६ मध्ये ट्रम्प यांनी या व्हिसाला अमेरिकेच्या हिताच्या विरोधात म्हटले होते. २०१९ मध्ये या व्हिसाचे एक्सटेंशन निलंबित केले. गेल्या महिन्यातच यू-टर्न घेत त्यांनी म्हटले आम्हाला प्रतिभेची गरज आहे.
गोल्ड कार्डमध्ये कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार ट्रम्प यांनी एच-१बी मध्ये बदलांव्यतिरिक्त ३ नवीन प्रकारचे व्हिसा कार्ड लॉन्च केले होते. ट्रम्प गोल्ड कार्ड, ट्रम्प प्लॅटिनम कार्ड आणि कॉर्पोरेट गोल्ड कार्ड यांसारख्या सुविधा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प गोल्ड कार्ड (८.८ कोटी किंमत) व्यक्तीला अमेरिकेत अमर्यादित रेसिडेन्सी (कायमस्वरूपी राहण्याचा) अधिकार देईल.

टेक कंपन्या सर्वाधिक एच-१बी स्पॉन्सर
भारत दरवर्षी लाखो अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान पदवीधर तयार करतो, जे अमेरिकेच्या टेक उद्योगात मोठी भूमिका बजावतात. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट आणि एचसीएल यांसारख्या कंपन्या सर्वाधिक आपल्या कर्मचा-यांना एच-१बी व्हिसा स्पॉन्सर करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR