शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर तुम्हाला सोडणार नाही;रुपाली ठोंबरेंचा मुरलीधर मोहोळांना इशारा

पुणे : प्रतिनधी
देशासह पुण्यातही विजया दशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध कार्यक्रम आणि पथसंचलन पार पडले. यानिमित्ताने भाजपच्या अनेक मंत्र्यांनी बॅनर्स लावले होते. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत गोळवलकरांचे फोटो लावण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांना सुनावले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मी जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो लावण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. शिवरायांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, मग तुम्ही हे सातत्याने का करत आहात? जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अवमान करत राहिलात, तर आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. भाजपच्या प्रतिनिधींकडे मेंदू असेल आणि तुम्ही शिकलेले असाल, तर वेळीच जागृत व्हा आणि शिवरायांचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्या. जर अशीच वागणूक सुरू राहिली, तर आम्हाला वेगळ्या मार्गाने उत्तर द्यावे लागेल.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भाजपकडून आम्हाला जी दुजाभावाची वागणूक मिळत आहे, ती आता लपून राहिलेली नाही. भाजपकडून मिळणा-या या वागणुकीबाबतची माहिती आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिली आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १३ वर्षे ज्या व्यक्तीवर विश्वास टाकून चालवे, तीच व्यक्ती आता वेगळे पॅनल तयार करत आहे. त्यांना जर भाजपची फूस किंवा मदत मिळत असेल, तर या सर्व गोष्टींना सामोरे जात जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पदवीधर निवडणुकीत आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला जातो आणि तो आमच्यावर लादला जातो. मित्रपक्ष म्हणून सोबत बसलो असतानाही जर आम्हाला सातत्याने अशी दुय्यम वागणूक दिली जात असेल, तर आमच्या मनात याविषयी मोठी खंत कायम आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news