लाहोर : तुरुंगात बंदिस्त असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहीण अलीमा खानुम यांना लाहोरमधील त्यांच्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. इमरान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांसोबत इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्या २७ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू करणार होत्या. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत.
अलीमा खानुम यांच्या अटकेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी अद्याप अटकेच्या कारणाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. अलीमा खानुम यांच्या अटकेपूर्वी इस्लामाबाद पोलिसांनी ढळकच्या चार कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की २७ सप्टेंबरच्या निदर्शनांच्या तयारीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर या लोकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर दंगल घडवणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिस कर्मचा-यांवर हल्ला करणे, असे आरोप ठेवले आहेत.
२७ सप्टेंबर रोजी राजधानी इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, या आंदोलनाचा मुख्य उद्देश इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करणे हा आहे. अध्यक्ष बॅरिस्टर गोहर अली खान यांनी याला आधीच शांततापूर्ण मार्च असे संबोधले आहे.
आंदोलनापूर्वी इस्लामाबादमध्ये सुरक्षा वाढवली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पोलिस आणि प्रशासनाने शहरात ये-जा करणा-या मार्गांची तसेच संवेदनशील भागांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. आंदोलनाशी संबंधित हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे.
















