पीओकेत विरोध प्रदर्शन तीव्र

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर (पीओके) मध्ये सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. प्रसार माध्यमांनुसार या निवडणुकीत खूप कमी मतदान झाले आहे.

अनेक भागांमध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र, सरकारने अद्याप मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, पीओकेमध्ये सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. हजारो लोक निवडणूक प्रक्रिया आणि पाकिस्तान सरकारच्या धोरणांविरोधात राजधानी मुझफ्फराबादकडे कूच करत आहेत. रावलाकोटमध्ये कूच करत असलेल्या आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात किमान ८ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या निदर्शनांचे नेतृत्व जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमिटी (जेएएसी) करत आहे. सरकारने ५ जून रोजी प्रस्तावित निदर्शनांच्या काही दिवस आधीच या संघटनेवर बंदी घातली. यानंतर संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. काही नेते भूमिगत झाले, तर काही अजूनही पुंछ विभागाच्या मुख्यालय रावलाकोटमधील धरणेस्थळांवरून आंदोलन करत आहेत. निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षात सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी सतत धरणे आणि रस्ते अडवण्यात आले आहेत.

निवडणुकीपूर्वी संपूर्ण परिसर का पेटला?
परिस्थिती इतकी बिघडली की, बँका सलग दोन आठवडे बंद राहिल्या. बहुतेक भागांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा अजूनही बंद आहेत. भारताच्या सीमेला लागून असलेला पुंछ विभाग, जिथे सर्वाधिक विरोध प्रदर्शन झाले, तो अनेक आठवडे जवळजवळ पूर्णपणे सील होता. यामुळे तिथे पीठ आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात बाधित झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news