भारत उतरणार कंटेनरनिर्मितीत

नवी दिल्ली : जगात कंटेनरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रणनीती आखली आहे. यांतर्गत कंटेनरनिर्मिती प्रोत्साहन योजनेवर १०,००० कोटी रुपये खर्च केले जातील. या क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देणे आणि भारताला कंटेनरनिर्मितीचे प्रमुख केंद्र बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रीडा साहित्य उद्योगाला चालना देण्यासाठी १,८५६.६७ कोटी रुपयांच्या योजनेलाही मंजुरी दिली आहे. या दोन्ही योजनांमुळे देशांतर्गत उत्पादन, गुंतवणूक आणि रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

भारतातील कंटेनरच्या मागणीचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण केला जातो. चीन या क्षेत्रातील प्रमुख पुरवठादार आहे. जागतिक संकटांच्या काळात कंटेनरच्या किमती आणि भाड्यातील चढ-उतारामुळे व्यापा-यांचा खर्च वाढतो. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने हे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. क्रीडा साहित्यनिर्मितीसाठी विशेष क्षेत्र क्रीडा साहित्यनिर्मिती प्रोत्साहन योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १,८५६.६७ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. ही योजना २०२६ ते २०३३-३४ पर्यंत लागू राहील. यांतर्गत क्रीडा साहित्य बनवण्यासाठी विशेष उत्पादन क्षेत्रे विकसित केली जातील. या क्षेत्रांमध्ये उत्पादन घटकांसह डिझाईन, चाचणी आणि तांत्रिक विकासाच्या सुविधाही उपलब्ध असतील. या योजनेत देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच लघू आणि मध्यम उद्योगांना मदत केली जाईल. उत्पादकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणीकरण मिळवण्यात मदत होईल. संशोधन, नवीन तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सनाही प्रोत्साहन दिले जाईल.

परदेशी बाजारपेठेत सहभाग वाढणार
भारतीय क्रीडा साहित्याचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि परदेशात बाजारपेठ वाढवण्यासाठीही पावले उचलली जातील. योजनेंतर्गत विशेष क्रीडा साहित्य उत्पादन क्षेत्रे तयार केली जातील. या क्षेत्रांमध्ये क्रीडा साहित्य बनवणा-या कंपन्यांसह कच्च्या मालाचे पुरवठादार, तपासणी केंद्र, डिझाईन केंद्र आणि नमुने तयार करण्याच्या सुविधाही असतील. यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास आणि काम अधिक प्रभावी करण्यास मदत होईल.

कंटेनरनिर्मिती प्रोत्साहन योजना आर्थिक वर्ष २०३९-४० पर्यंत लागू
– नवीन कारखाने उभारणी, सध्याच्या युनिटच्या विस्तारासाठी आर्थिक मदत
– सुमारे ३,००० प्रत्यक्ष, ५०,००० पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती
– देशांतर्गत कंटेनरनिर्मितीची वार्षिक क्षमता सुमारे १० पटीने वाढवण्याचे (७.५ लाख टीईयूपर्यंत नेण्याचे) उद्दिष्ट
– पात्र उत्पादकांना कर्जावर वर्षाला ३ टक्के व्याज सवलत
– कंटेनरचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादने स्पर्धाक्षम बनवणार

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news