31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयभारतीय हवाई दलात आता ‘अग्निवीरवायू’ भरती

भारतीय हवाई दलात आता ‘अग्निवीरवायू’ भरती

‘आयएएफ’कडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली : अग्निवीर भरतीची तयारी करणा-या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी असून इंडियन एअर फोर्सने अग्निवीरवायु भरती २०२७ साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी अग्निवीरवायु २०२७ ही भारतीय हवाई दलात प्रवेशाची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून निवड प्रक्रियेसाठी तयारी करावी.

१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत
भारतीय हवाई दलाने १२ जानेवारी रोजी अग्निवीरवायु २०२७ भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली. इच्छुक उमेदवारांनी https://iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी २०२६ आहे. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे. अग्निवीरवायु २०२७ भरतीची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत होईल. ऑनलाईन लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी, पुरुष : १.६ किमी धावणे – ७ मिनिटांत, महिला : १.६ किमी धावणे – ८ मिनिटांत, यासोबत पुश-अप्स, सिट-अप्स, स्क्वॉट्स, ऍडॅप्टेबिलिटी टेस्ट, वैद्यकीय तपासणी आणि अंतिम गुणवत्ता यादी.

कोण अर्ज करू शकतो?
अग्निवीरवायु २०२७ भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय निकष ठरवण्यात आले आहेत.

वयोमर्यादा
कमाल वय : २१ वर्षे
जन्मतारीख : १ जानेवारी २००६ ते १ जुलै २००९ दरम्यान पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा समान

शैक्षणिक पात्रता
– १२ वी उत्तीर्ण
– विषय : गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी
– एकूण किमान ५०% गुण
– इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे ५०% गुण अनिवार्य

वैद्यकीय व शारीरिक निकष
– किमान उंची : १५२ सेमी
– पर्वतीय व ईशान्य भारतातील महिला उमेदवारांना ५ सेमी उंची सवलत
– दात, ऐकण्याची क्षमता, दृष्टी यांचे ठरावीक निकष लागू, पुरुष व महिला
उमेदवारांसाठी वैद्यकीय निकष वेगवेगळे

वैवाहिक स्थिती
फक्त अविवाहित उमेदवार पात्र
महिला उमेदवार गर्भवती आढळल्यास भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR