26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeक्रीडाहाँगकाँग क्रिकेट स्पर्धेत भारताचा पराभव

हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेत भारताचा पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाची पराभवाने सुरुवात झाली आहे. टीम इंडियाला कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर ६ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजयी आव्हान हे एकही विकेट न गमावता १ ओव्हरआधीच पूर्ण केले. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावांचे आव्हान मिळाले होते. पाकिस्तानने हे आव्हान सहज पूर्ण केले.

पाकिस्तानसाठी आसिफ अली याने सर्वाधिक धावा केल्या. आसिफने १४ बॉलमध्ये ७ षटकार आणि २ चौकारांसह ५५ धावा केल्या. त्यानंतर आसिफ अली रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर मुहम्मद अखलाक आणि कॅप्टन फहीम अश्रफ या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत नेले. मुहम्मद अखलाक याने १२ बॉलमध्ये ६ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ४० धावा केल्या. तर फहीमने ५ बॉलमध्ये १ चौकार आणि ३ षटकार ठोकून २२ धावा केल्या. भारतीय संघाकडून एकालाही विकेट घेता आली नाही.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ ओव्हरमध्ये २ गडी गमावून ११९ धावा केल्या. भरत चिपली याने सर्वाधिक ५३ धावा केल्या आणि रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. कॅप्टन रॉबिन उथप्पा याने ८ चेंडंूत ३ षटकार आणि तितक्याच चौकारांसह ३१ धावा केल्या. केदार जाधव याने ८ धावा करून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर मनोज तिवारी आणि स्टुअर्ट बिन्नी जोडी नाबाद परतली. मनोजने १७ आणि स्टुअर्टने ४ धावा केल्या. पाकिस्तानकडून आमेर यामिन यानेच दोन्ही विकेट्स घेतल्या.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी टीम इंडिया
रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी आणि स्टुअर्ट बिन्नी.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम
फहीम अश्रफ (कॅप्टन), आमेर यामिन, आसिफ अली, दानिश अझीज, हुसैन तलात, मुहम्मद अखलाक आणि शाहाब खान.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR