26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeराष्ट्रीयपूर्णपणे स्वदेशी बनावटीची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार

पूर्णपणे स्वदेशी बनावटीची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार

जगातील सर्वांत लांब आणि शक्तीशाली ट्रेन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद-गोहाना-सोनीपत ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीननंतर ही तंत्रज्ञान स्वीकारणारा भारत जगातील पाचवा देश बनेल. यासाठी जिंदमध्ये एक आधुनिक हायड्रोजन प्लांट बांधला जात आहे आणि इंजिन देखील तयार करण्यात आले आहे. ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असेल, जी २,६३८ प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असेल आणि ताशी ११० ते १४० किलोमीटर वेगाने धावेल. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित, ही ट्रेन फक्त पाणी आणि वाफ उत्सर्जित करेल, ज्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही.

भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली ट्रेन चालवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात सांगितले की, देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन आरडीएसओ(रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) च्या मानकांनुसार संपूर्णत: स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन असेल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये त्याचा कोच तयार करण्यात आला आहे आणि त्याची चाचणी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

जींदमध्ये तयार होणार ग्रीन हायड्रोजन प्लांट
हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असून, भारताचे इंजिनीअरिंग सामर्थ्य दर्शवते. ट्रेन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी हरियाणातील जींद येथे इलेक्ट्रोलिसिस आधारित हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. रेल्वेसाठी ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे. या पूर्णपणे स्वदेशी डिझाईन व विकासामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेलाही चालना मिळाली आहे.

कशी असेल ट्रेन?
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन(१० कोच) असेल. ही ट्रेन ब्रॉड गेजवर चालेल आणि ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हिंग पॉवर कार(डीपीसी) असून प्रत्येकाची क्षमता १२०० केडब्ल्यू, तर एकूण क्षमता २४०० केडब्ल्यू असेल.

८ प्रवासी कोच
या ट्रेनमध्ये ८ प्रवासी कोच जोडण्यात आले आहेत. या ट्रेनचे एकमेव उत्सर्जन जलवाष्प असल्याने ती पूर्णपणे शून्य-कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित राहील. हायड्रोजन ट्रॅक्शन हे नेक्स्ट-जनरेशन फ्यूल तंत्रज्ञान असून, हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR