17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमेक्सिकोतील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार!; १० ठार

मेक्सिकोतील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार!; १० ठार

क्वेरेटारो : मध्य मेक्सिकोतील एका बारमध्ये बंदूकधा-यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिका-यांनी दिली आहे.

मेक्सिकोतील क्वेरेटारो येथे एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वृत्तानुसार, काही सशस्त्र हल्लेखोरांनी बारमध्ये प्रवेश केला आणि तेथे बसलेल्या लोकांना आणि कर्मचा-यांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रादेशिक संघर्षांशी संबंधित हे प्रकरण असण्याची शक्यता तपास अधिका-यांनी वर्तवली असून या घटनेचा तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार पसरला आहे. अशा घटना रोज समोर येत आहेत. काल शनिवारी एका सीफूड रेस्टॉरंटमध्ये तिघांची हत्या झाली होती, असेही पोलिस अधिका-यांनी म्हटले आहे.

अहवालानुसार, ९ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा किमान चार सशस्त्र लोकांच्या एका गटाने बारमध्ये प्रवेश केला आणि अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात १० लोक ठार झाले. तर अनेकजण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सुरक्षा वाढवली
घटना घडल्यानंतर या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. पोलिसांच्या धाडीनंतर स्थानिक वाहतूक आणि व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांनी गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु गेल्या काही दिवसांपासून या भागात वाढलेल्या हिंसाचाराचाही या घटनेशी संबंध जोडला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR