पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्बस्फोट

नवी दिल्ली/ मुंबई : प्रतिनिधी
दहीहंडी, पोळा आणि गणेशोत्सव हे महत्त्वाचे सण तोंडावर असतानाच महागाईचा बॉम्ब फुटला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तो महागाई आणि दरवाढ घेऊनच! दोन आठवड्यांपासून साखर किलोमागे तब्बल २० रुपयांनी महागली आहे, गूळ, वेलची अगोदरच महागले आहे. हे कमी म्हणून की काय मंगळवारपासून एक लिटर दुधासाठी आता ९ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. शिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडर, पाईपलाईनने पुरवला जाणारा गॅस, सीएनजी, रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही महागले आहे. यात महागलेल्या कुरिअर डिलिव्हरीचाही समावेश करावा लागेल.

१ सप्टेंबरपासून देशाच्या विविध भागांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ लागू झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर ९.५० रुपये एवढी वाढ केली आहे. ही वाढ लगेचच लागू झाली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता २,७३८ वरून वाढून २,७४७.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ही किंमत वाढून २,९१६.५० रुपये झाली आहे. तसेच ५ किलोच्या मानक एलपीजी सिलिंडरच्या दरातही २ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबे, मिठाईची दुकाने आणि स्वयंपाक तसेच इतर कामांसाठी व्यावसायिक एलपीजी वापरणा-या अशाच प्रकारच्या इतर व्यवसायांवर होईल. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढलेले नाहीत.

सीएनजी २ रुपयांनी महागले
मुंबईत सीएनजी आणि घरगुती पीएनजीचे (पाईपलाईन गॅस) दरही वाढले आहेत. मुंबईतील सीएनजी आणि पीएनजी दरातील वाढीचे कारण ‘इनपुट गॅस’च्या (कच्च्या गॅसच्या) वाढत्या किमतीत आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ सोमवार (३१ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर लागू झाली आहे. परिणामी, मुंबई आणि लगतच्या भागात सीएनजीचा नवीन दर आता प्रति किलो ८८ रुपये झाला आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ करावी लागत असल्याचे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येते.

पीएनजीच्या युनिटमध्ये रुपयाची वाढ
मुंबईत पाईपलाईनने पुरवला जाणारा घरगुती गॅसच्या दरातही प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम सुमारे ३० लाख घरगुती पीएनजी ग्राहकांवर होईल. गॅसच्या वाढत्या खर्चामुळे पीएनजीच्या दरात बदल करणे आवश्यक असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.

दूध ९ रुपयांनी महागले
मुंबई दूध उत्पादक संघटनेने म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात कधी नव्हे एवढी विक्रमी वाढ जाहीर केली आहे. आतापर्यंत ९३ रुपये प्रति लिटर मिळणारे दूध आता थेट १०२ रुपये प्रति लिटर झाले आहे. पशुखाद्य आणि चा-याचे दर तब्बल २५ टक्क्यांनी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे दर १ सप्टेंबरपासून २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील. त्यामुळे चहा, मिठाई आणि रोजच्या दुधावर याचा मोठा आर्थिक भार पडणार आहे.

रिक्षा-टॅक्सी प्रवास महागला
रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात देखील १ सप्टेंबरपासून वाढ करण्यात आली आहे. काळी-पिवळी टॅक्सीचे पहिल्या १.६ किलोमीटरसाठी ३१ रुपयांवरून ३३ रुपये करण्यात आले आहे. शिवाय प्रति किलोमीटरच्या टप्प्यावरही किरकोळ दरवाढ लागू झाली आहे. वाढत्या महागाईसोबत मुंबई महापालिकेकडून शहरातील सार्वजनिक ‘पे अँड पार्क’ दरांमध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तयारी सुरू आहे.

कुरिअर महागले
ऑनलाईन शॉपिंग आणि कुरिअर सेवेवरही महागाईचा परिणाम झाला आहे. प्रमुख कुरिअर कंपनीने एक्स्प्रेस शिपिंगवर ४ रुपये आणि रस्ता वाहतूक (सरफेस) शिपिंगवर २ रुपये प्रति पार्सल शुल्क वाढवले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्या आणि ग्राहकांनाही याचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news