21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeउद्योगमहागाई निर्देशांक ५.६९ टक्क्यांवर

महागाई निर्देशांक ५.६९ टक्क्यांवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) ५.६९ टक्के इतका नोंदविला गेला. किरकोळ महागाई निर्देशांकाची ही गत चार महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे.

नोव्हेंबरमध्ये सीपीआय निर्देशांक ५.५५ टक्के इतका होता. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये हा निर्देशांक वाढून ५.६९ टक्के इतका झाला. खाद्यान्न श्रेणीतील वस्तूंच्या किमतीत ९.५३ टक्क्याने वाढ झाली. महागाई दर चढा असल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात हस्तक्षेप होणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातील महागाई निर्देशांक ५.९३ टक्के तर शहरी भागातील सीपीआय निर्देशांक ५.४६ टक्के इतका नोंदवला गेला. डिसेंबरमध्ये भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्या तुलनेत इंधन आणि ऊर्जा श्रेणीचा निर्देशांक स्थिर होता.

डिसेंबर महिन्यात डाळींच्या महागाईत वाढ झाली असून ती २०.७३ टक्के झाली आहे. जी नोव्हेंबर महिन्यात २०.२३ टक्के होती. भाज्यांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली असून, गेल्या महिन्यात १७.७० टक्के होती, ती २७.६४ टक्के झाली आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. ती ९.९३ टक्के राहिला आहे, जो मागील आठवड्यात १०.२७ टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर १९.६९ टक्के आहे, जो मागील महिन्यात २१.५५ टक्के होता. फळांचा महागाई दर ११.१४ टक्के आहे, जो मागील महिन्यात १०.९५ टक्के होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR