23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगला देशात अंतरिम सरकार

बांगला देशात अंतरिम सरकार

मोहमद युनस यांच्यासह १५ सदस्यांनी घेतली शपथ

ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. अखेर आज अंतरिम सरकार स्थापन झाले. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून ८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

बांगलादेशात अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आता बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान मोहम्मद युनूस यांच्यासमोर आहे.

शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यावेळी मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस हे परदेशातून बांगलादेशात परतले. आज त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली.

बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे अंतरिम सरकार चालवणे आव्हानात्मक असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR