23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानमध्ये स्फोट, २० ठार

अफगाणिस्तानमध्ये स्फोट, २० ठार

एकमत ऑनलाईन

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. काबुलमधील एका मशिदीत हा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये २०जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ४० जण जखमी झाले आहेत. काबुलच्या इमरजन्सी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण २७ जणांना दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे.

बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण भागाला तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी सील केले आहे. सध्या जखमींना काबुलच्या वेगवेगळ््या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काबुल शहराच्या सर ए कोटल खैरखानामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. काबुलचं सिक्युरिटी डिपार्टमेंट खालिद जरदानने या स्फोटाची पुष्टी केली आहे.

मशिदीत केलेल्या या बॉम्बस्फोटाची अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून जबाबदारी घेण्यात आलेली नाही. पण मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या ब-याच हल्ल्यांमध्ये मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे. पण यावेळचा हल्ला वेगळा असल्याचे स्थानिक मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत शिया मशिदींना दहशतवादी संघटना आयएसद्वारा लक्ष्य केले जात होते. पण आता ज्या भागात बॉम्बस्फोट झाला आहे तिकडे शिया लोकसंख्या नाही.

काबुलमध्ये सध्या तालिबानचं सरकार आहे. काहीच दिवसांपूर्वी तालिबान सरकारने एक वर्ष पूर्ण केले. अशरफ गनी यांना सत्तेतून बाहेर काढत तालिबानने काबुलवर कब्जा केला. तालिबानमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बॉम्बस्फोटांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वीही काबुलच्या एका मशिदीमध्ये धमाका झाला होता, ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला. त्याआधी अफगाणिस्तानमधल्या गुरूद्वारांनाही टार्गेट करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या