24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानात मशिदीबाहेर भीषण स्फोटात २० ठार

अफगाणिस्तानात मशिदीबाहेर भीषण स्फोटात २० ठार

एकमत ऑनलाईन

हेरात : अफगाणिस्तानच्या हेरात शहरात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला. या स्फोटात मशिदीचे इमाम मारले गेल्याचे सांगितले जात आहे, तसेच सामान्य लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. मात्र, मृतांच्या संख्येला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात शहरात एका मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात तालिबान समर्थित हाय-प्रोफाइल इमाम आणि नागरिक ठार झाले आहेत. तालिबानी अधिकाऱ्यांनी स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात मशिदीचे मुजीबुर रहमान अन्सारी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या स्फोटात मशिदीचे मौलवी मुजिह अल-रहमान अन्सारी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तालिबानच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे हेरातमध्ये दोन स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २०० लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

हेरातच्या गव्हर्नरच्या प्रवक्त्याने या स्फोटाचे कारण हे आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले आहे. स्फोट झाला तेव्हा मशिदीत शुक्रवारची नमाज सुरू होती, असे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, ठार झालेल्यांच्या नेमक्या आकड्याबाबत काहीही सांगता येणार नाही. हेरातमधील गुजरगाह मशिदीत हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या