27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकन ‘चिनूक’चा ताफा माघारी; मात्र भारत सचिंत

अमेरिकन ‘चिनूक’चा ताफा माघारी; मात्र भारत सचिंत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकेच्या लष्कराने ‘चिनूक’ हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड (मागे घेण्याचा) करण्याचा निर्णय घेतला आहे. या हेलिकॉप्टर्सच्या इंजिनामध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या, या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्कराने हा निर्णय घेतला. पण यामुळे भारताची चिंता वाढली असून अमेरिकेकडे या निर्णयाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

अमेरिकन संरक्षण उत्पादक कंपनी बोईंगकडून चिनूक हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाते. भारतीय हवाई दलाने या कंपनीकडून १५ चिनूक हेलिकॉप्टर्स विकत घेतली आहेत. मार्च २०१९ मध्ये ही हेलिकॉप्टर्स सेवेत समाविष्ट केली गेली. ही हेलिकॉप्टर्स भारताकडून उत्तरेकडील ऑपरेशन्ससाठी लडाखमध्ये तर ईशान्येकडील भागांची काळजी घेण्यासाठी दुसरे युनिट आसाममध्ये तैनात आहे.

दरम्यान, यूएस आर्मी मटेरिअल कमांडने ७० पेक्षा जास्त चिनूक सीएच ४७ हेलिकॉप्टरची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगून फ्लीट ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला. वॉल स्ट्रीट जर्नलने यूएस आर्मी अधिका-यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, त्या हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात सुमारे ४०० हेलिकॉप्टर आहेत.

हेवी-लिफ्ट युटिलिटी हेलिकॉप्टर
चिनूक हे हेवी-लिफ्ट युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. जे नियमित आणि विशेष सैन्य दलांद्वारे वापरले जाते. चार डझनहून अधिक सैन्य किंवा मालवाहतूकही याद्वारे केली जाऊ शकते. सहा दशकांपासून या हेलिकॉप्टरने अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात एक प्रमुख स्थान पटकावले. चिनूक हेलिकॉप्टर बोईंग या एरोस्पेस कंपनीने बनवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या