25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन धोकादायक अन् अनफीट

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन धोकादायक अन् अनफीट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अवकाशातील आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशन हे धोकादायक स्थितीत आणि अनफीट असल्याचं रशियानं म्हटलं आहे. महिन्याभरापूर्वी हे स्टेशन बंद करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं हा दावा केला आहे. दरम्यान, रशिया चीन प्रमाणं स्वतःच स्वतंत्र स्पेश स्टेशन तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

रशियन स्पेस एजन्सी रेस्कोसमोसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधील उपकरणं निकामी झाली आहेत. तसेच इथल्या जुन्या झालेल्या काही भागांमुळं इथं काम करणाऱ्या क्रू ची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी रशियानं आपण स्वतंत्र स्पेस स्टेशन उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता रशियानं स्पेस स्टेशनबाबत हे विधान केलं आहे. रशिया अवकाशातील झिरो ग्रॅव्हीटीमध्ये चीनप्रमाणं स्पेस स्टेशन उभारणार आहे.

तांत्रिकदृष्ट्याने आपली सर्व वॉरंटी कालावधी ओलांडल्या असून हे धोकादायक आहे. उपकरणं निकामी होण्याची स्थिती ही हिमस्खलनासारखी आहे. त्यामध्ये क्रॅक दिसू लागले आहेत, असं रॉयटर्सनं बोरिसोव्हच्या हवाल्यानं हे म्हटलं आहे. पुढं त्यांनी म्हटलं की, रशियाचं स्पेस स्टेशन हे पृथ्वीच्या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालेल, ज्यामुळं ते रशियाच्या विस्तीर्ण भूभागाकडे पाहण्यास आणि वैश्विक किरणोत्सर्गावर नवीन डेटा गोळा करण्यास सक्षम असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या