23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआण्विक, सायबर सुरक्षेचा ३० अब्ज डॉलर्सचा करार

आण्विक, सायबर सुरक्षेचा ३० अब्ज डॉलर्सचा करार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत-अमेरिकेच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांमधील २+२ चर्चा जवळपास १५० मिनिटे चालली. यात दोन्ही देशांतील अंतर्गत व्यापार १५० अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाण्यावर सहमती झाली. यामध्ये आण्विक, अंतराळ, सायबर सुरक्षा आणि अंतराळ अभियानाच्या क्षेत्रांत ३० अब्ज डॉलर (२.२८ लाख कोटी रुपये) गुंतवणुकीवर सहमती झाली.

युक्रेन युद्ध, अफगाणिस्तानात स्थैर्य, दहशतवादविरोधी अभियान, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमली पदार्थांच्या तस्करीवर लगाम लावणे आदी मुद्यासह व्यापार आणि व्यावसायिक करारांवर चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेचे समकक्ष लॉइड ऑस्टिन आणि अँटोनी ब्लिंकेन यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अजेंड्यात दोन्ही देशांतील व्यापार १५० अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाण्याचा मुद्दाही होता. दोन्ही देश याबाबतीत ब-याच अंशी यशस्वीदेखील झाले आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी भारतातील काही सरकारी अधिकारी, पोलिस आणि कारागृह अधिका-यांनी केलेल्या मानवी हक्क उल्लंघनाचा मुद्दा मांडला. हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. बायडेन प्रशासनाचा एक अधिकारी म्हणाला, चीनसोबत एलएसीवर तणावपूर्ण स्थितीचा सामना करणा-या भारतात रशिया आणि चीनमधील घट्ट संबंधांबाबत चिंता आहे. यामुळे वैश्विक समस्यांवर, त्यांच्या निर्णयांवर परिणाम होईल. दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये याबाबत १५० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या