24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयव्हिस्कीचा तुटवडा; अनेक ब्रॅण्ड बंद होणार

व्हिस्कीचा तुटवडा; अनेक ब्रॅण्ड बंद होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात येत्या काळात व्हिस्कीच्या अनेक ब्रँडची विक्री बंद होण्याची शक्यता आहे. जॉनी वॉकर, मॅकडॉवेल, ब्लॅक डॉग, स्मिरनॉफ सारख्या व्हिस्की बनविणारी कंपनी डियाजियो पीएलसीने या ब्रँडची विक्री बंद केली आहे.

डियाजिओ कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. यामुळे येत्या काळात या कंपनीच्या मद्याची टंचाई निर्माण होणार आहे. कंपनीला भारतात ९० लाख डॉलरचे नुकसान झाले आहे. यामुळे डियाजिओने भारतात काही ब्रँडची विक्री बंद केली आहे.

डियाजिओच्या भारतातील प्रमुख हिना नागराजन यांनी याचे कारणही दिले आहे. महागाई वाढल्याने खर्च खूप वाढला आहे. भारत सरकारच्या नियमांमुळे आम्हीकिंमतीही वाढवू शकत नाही आहोत. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे, असे त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या