26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठविली

इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंदी उठविली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाईने होरपळणा-या देशातील सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंडोनेशियाने २३ मे पासून पाम तेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी देशातील व्यापारी नेत्यांनी राष्ट्रपतींकडे निर्यात निर्बंध हटवण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक तर भारतात पामतेल स्वस्त होऊ शकते. सोबतच सौदर्य प्रसाधनांसह साबण, शाम्पू उत्पादनासाठी हे तेल लागणार असल्याने या उत्पादकांच्या दरवाढीचेही संकट टळणार आहे.

भारत इंडोनेशियामधून पाम तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. परंतु इंडोनेशियाने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी इतर देशांना पामतेल देण्यास नकार दिला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने इंडोनेशियाने २३ मे पासून पामतेल निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा भारतालाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडोनेशिया पामतेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असून, भारताच्या वार्षिक गरजांपैकी ५० टक्के गरजा फक्त इंडोनेशिया पूर्ण करतो. भारतीय घरांमध्ये पामतेल थेट स्वयंपाकात वापरले जात नाही. परंतु त्याची उपस्थिती सर्वत्र आहे. खाद्यतेल ते सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जंट यासारख्या उत्पादनांमध्येही पामतेलाचा वापर केला जातो. त्यामुळे भारताला पामतेलाची गरज आहे. इंडोनेशियाने निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आगामी काळात पामतेल स्वस्त होऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या