26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकाबूल उद्यान, जत्रांमध्ये महिलांना बंदी

काबूल उद्यान, जत्रांमध्ये महिलांना बंदी

एकमत ऑनलाईन

काबूल : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने राजधानी काबूलमध्ये महिलांना सार्वजनिक उद्यान आणि जत्रेत जाण्यास बंदी घालणारा हुकूम गुरुवारी जारी केला. महिलांना त्यांच्या मुलांसह उद्यान आणि जत्रेतही जाता येणार नाही. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या उद्यानात पूर्वी महिला हिजाबशिवायही प्रवेश करू शकत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानंतर काबूलचे प्रसिद्ध जझाई पार्क ओसाड झाले आहे. येथील महिला आपल्या पुरुष जोडीदाराशिवाय घराबाहेरही पडू शकत नाहीत. काबूलमधील मुलींच्या बहुतांश माध्यमिक शाळा वर्षाहून अधिक काळापासून बंद आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या