22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयझॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी

झॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी

एकमत ऑनलाईन

बर्लिन : युक्रेन आणि रशिया यांच्या बाँबफेकीमुळे धोक्यात आलेल्या झॅपोरिझ्झिया येथील अणुप्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे पथक युक्रेनमध्ये दाखल झाले.

या प्रकल्पाची सुरक्षा तपासणी करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी या संस्थेचे महासंचालक राफेल ग्रॉसी हे गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करत होते. युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया शहर सध्या रशियाच्या ताब्यात आहे.

झॅपोरिझ्झियाला लागून असलेल्या शहरांवर अद्यापही युक्रेनने नियंत्रण कायम ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा आणि बाँबगोळ्यांचा मारा केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या