26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयदुर्गापूजेचा मान वाढला, ‘युनेस्को’च्या यादीत समावेश

दुर्गापूजेचा मान वाढला, ‘युनेस्को’च्या यादीत समावेश

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या दुर्गापूजेचा युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादीत समावेश केला आहे. यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युनेस्कोचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी कोलकाता इथे मोठी रॅली काढली.

या रॅलीमध्ये सुमारे १००० दुर्गापूजा कमिटीच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. उत्तर कोलकात्यातील जरासंका भागात ममतांनी रॅली काढली होती.

रॅलीदरम्यान, जनतेशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला युनेस्कोचे आभार मानायचे आहेत की त्यांनी पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेला ‘आयसीएच’ टॅग दिला. यामुळे आता आजपासून पुढे दुर्गापूजा उत्सव एक महिना अ‍ॅडव्हान्समध्ये सुरु होईल.

युनेस्कोसाठी आभार रॅलीत सहभागी झालेल्या लोकांचेही मी स्वागत करते तसेच जगभरातून ही रॅली पाहणा-यांचेही आभार मानते, असेही ममता यावेळी म्हणाल्या.

दुर्गापूजा ही बंगाली जनतेची भावना आहे. या परंपरेमुळे सर्व गटातील लोक एकत्र येतात. यामध्ये कला आणि अध्यात्म एकत्र येते. मी युनेस्कोचे आभार मानते की त्यांनी दुर्गा पूजेला अमुर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या